Breaking

आता लवकरच आपल्या भेटीला येनार 1600mah battry वाला फोन,

आता लवकरच आपल्या भेटीला येनार 1600mah battry वाला मोबाई फोन,

नवी दिल्ली : स्मार्टफोन निर्माता कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नव्या योजना आखताना दिसत आहेत. ग्राहकांच्या आवडी-निवडी काय आहेत? याचा विचार केला जात आहे.
बाजारात अनेक प्रकारचे स्मार्टफोन लॉन्च होत असतात. परंतु, स्मार्टफोनमधील बॅटरीची क्षमता कमी असल्यामुळे ग्राहकांना त्यांचा स्मार्टफोन जास्त काळ वापरता येत नाही. यासाठी २०१८मध्ये असे काही स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत, ज्यामध्ये धमाकेदार फिचर देण्यात आले आहेत. त्याचबरोबर हे स्मार्टफोन बघताच ग्राहकांना पसंत पडतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. स्मार्टफोनची बॅटरी निर्माण करणारी कंपनी Energizer ने बार्सिलोनामध्ये आयोजित होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस कार्यक्रमात २६ स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली होती. कंपनीच्या माहितीनुसार, या स्मार्टफोनमध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा, फोल्डेबल डिस्प्ले आणि १८ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 
मोबाईल वर्ल्ड काँग्रेस कार्यक्रमात Energizer कंपनी प्रथम २ स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. अनलिमिट यू६२०एस पॉप आणि यू६३०एस पॉप हे २ स्मार्टफोन लॉन्च करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही स्मार्टफोनमध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर  यू६३०एस पॉप या स्मार्टफोनमध्ये ३ रिअर कॅमेरांचा (१६+५+२ मेगापिक्सल) समावेश करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम, १२८जीबी स्टोअरेज देण्यात आले आहे. यासोबत पॉवर मॅक्स पी १६के प्रो हा स्मार्टफोन लॉन्च करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या स्मार्टफोनची बॅटरी १६ हजार एमएएच आहे.
। तूम्हाला हा फोन कसा वाटला हे आमला खाली दीलेल्या कमेंट बाँक्स मध्ये कळवा |

No comments:

Post a Comment